Competition in this pair is now closed, and the winning entry has been announced. Discussion and feedback about the competition in this language pair may now be provided by visiting the "Discussion & feedback" page for this pair. Entries may also be individually discussed by clicking the "Discuss" link next to any listed entry. Source text in English A theme of the age, at least in the developed world, is that people crave silence and can find none. The roar of traffic, the ceaseless beep of phones, digital announcements in buses and trains, TV sets blaring even in empty offices, are an endless battery and distraction. The human race is exhausting itself with noise and longs for its opposite—whether in the wilds, on the wide ocean or in some retreat dedicated to stillness and concentration. Alain Corbin, a history professor, writes from his refuge in the Sorbonne, and Erling Kagge, a Norwegian explorer, from his memories of the wastes of Antarctica, where both have tried to escape.
And yet, as Mr Corbin points out in "A History of Silence", there is probably no more noise than there used to be. Before pneumatic tyres, city streets were full of the deafening clang of metal-rimmed wheels and horseshoes on stone. Before voluntary isolation on mobile phones, buses and trains rang with conversation. Newspaper-sellers did not leave their wares in a mute pile, but advertised them at top volume, as did vendors of cherries, violets and fresh mackerel. The theatre and the opera were a chaos of huzzahs and barracking. Even in the countryside, peasants sang as they drudged. They don’t sing now.
What has changed is not so much the level of noise, which previous centuries also complained about, but the level of distraction, which occupies the space that silence might invade. There looms another paradox, because when it does invade—in the depths of a pine forest, in the naked desert, in a suddenly vacated room—it often proves unnerving rather than welcome. Dread creeps in; the ear instinctively fastens on anything, whether fire-hiss or bird call or susurrus of leaves, that will save it from this unknown emptiness. People want silence, but not that much. | The winning entry has been announced in this pair.There were 13 entries submitted in this pair during the submission phase, 4 of which were selected by peers to advance to the finals round. The winning entry was determined based on finals round voting by peers.
Competition in this pair is now closed. | आजच्या युगाचा, निदान विकसित जगातला, केंद्र विषय म्हणजे लोक नीरवतेसाठी आसुसलेले असतात, पण त्यांना ती अजिबात मिळत नाही. वाहतुकीचा घरघराट, फोन्सची अथक बीप बीप, बसेस आणि ट्रेन्स मधल्या यांत्रिक आवाजातील उद्घोषणा, रिकाम्या कार्यालयांमध्येसुद्धा गर्जणारे टीव्ही संच, हा सगळा सतत चालणारा मारा आणि व्यत्यय असतो. आवाजामुळे मानवजात स्वतःला थकवून टाकत आहे आणि याच्याविरुद्ध परिस्थितीची आस धरून आहे- मग ती अरण्यात असो, की प्रशस्त महासागरांमध्ये असो, किंवा मग एखाद्या निःशब्दता आणि चित्त-केंद्रित होण्यास वाहून घेतलेल्या एकांतस्थळात असो. अॅलन कॉर्बिन हे इतिहासाचे प्राध्यापक आपल्या सॉर्बोनमधल्या आश्रयस्थानातून आणि एर्लिंग कॉग्ग हे नॉर्वेजियन शोधप्रवासी आपल्या अंटार्क्टिकाच्या ओसाड प्रदेशातील आठवणींबद्दल लिहितात. या दोघांनी या जागांवर जाऊन सुटका मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तरीही श्री. कॉर्बिन आपल्या “अ हिस्टरी ऑफ सायलेंस “ ( शांततेचा इतिहास) या पुस्तकात दाखवून देतात त्याप्रमाणे सध्याचा आवाज बहुदा पूर्वी होता त्यापेक्षा जास्त नाही. हवा भरलेले टायर येण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर धातूच्या धावा असणार्या चाकांचा आणि फरसबंदीवरील घोड्यांच्या टापांचा कान बधीर करणारा खणखणाट असायचा. मोबईल फोन्समध्ये रममाण होऊन जगापासून स्वेच्छेने अलग पडण्याच्या आधीच्या काळात बसेस आणि ट्रेन्स संभाषणांनी गजबजलेल्या असायच्या. वृत्तपत्र विक्रेते त्यांचा माल निःशब्द थप्प्यांमध्ये ठेवत नसत, उलट चेरीज, जांभळ्या जास्वंदीची फुले आणि ताजे मॅकरेल यांच्या विक्रेत्यांसारखेच टीपेच्या आवाजात त्यांची जाहिरात करत असत. थिएटर आणि ऑपेरा हाउसमध्ये हुर्रे आणि निषेधाच्या ओरड्यांनी गोंधळ चालू असायचा. अगदी ग्रामीण भागात देखील शेतकरी काबाडकष्ट करताना गाणी गायचे. आता ते गात नाहीत. पूर्वीच्या शतकातसुद्धा ज्याबद्दल तक्रार होती त्या आवाजाच्या पातळीत फारसा बदल झालेला नाही, तर तो झाला आहे व्यत्ययाच्या पातळीत आणि जो अवकाश शांततेने व्यापला असता त्याच्यावर हा व्यत्यय कब्जा करतो. इथे आणखी एक विरोधाभास पुढे उभा ठाकतो; कारण समजा शांततेने हा अवकाश व्यापलाच - पाईनच्या जंगलात खोलवर, उघड्यावागड्या वाळवंटात, अचानक रित्या झालेल्या दालनामध्ये- तर बरेचदा ती शांतता हवीहवीशी न वाटता भीतीदायक वाटते. भीती आपले हातपाय पसरते, उपजत प्रेरणेने कान कुठलीही चाहूल टिपण्याचा प्रयत्न करतात, मग तो आगीचा फुत्कार असो,की पक्ष्याची साद,किंवा पानांची सळसळ, जी त्यांना या अनोळखी रितेपणापासून वाचवेल. लोकांना शांतता हवी असते,पण इतक्या टोकाची नाही. | Entry #24095 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Winner Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
26 | 5 x4 | 3 x2 | 0 |
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 3.38 | 3.75 (8 ratings) | 3.00 (7 ratings) |
- 2 users entered 6 "like" tags
- 1 user disagreed with "likes" (3 total disagrees)
-1 1 आजच्या युगाचा, निदान विकसित जगातला, केंद्र विषय म्हणजे लोक नीरवतेसाठी आसुसलेले असतात, पण त्यांना ती अजिबात मिळत नाही | Flows well Very good description | Lalita Marathe | |
आवाजामुळे मानवजात स्वतःला थकवून टाकत आहे | Other good explanation of the fact | Lalita Marathe No agrees/disagrees | |
चित्त-केंद्रित होण्यास वाहून घेतलेल्या एकांतस्थळात असो | Other good description | Lalita Marathe No agrees/disagrees | |
-1 1 हवा भरलेले टायर येण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर धातूच्या धावा असणार्या चाकांचा आणि फरसबंदीवरील घोड्यांच्या टापांचा कान बधीर करणारा खणखणाट असायचा | Good term selection | Lalita Marathe | |
-1 1 भीती आपले हातपाय पसरते, उपजत प्रेरणेने कान कुठलीही चाहूल टिपण्याचा प्रयत्न करतात, मग तो आगीचा फुत्कार असो,की पक्ष्याची साद,किंवा पानांची सळसळ, | Good term selection | Angela Sontakey | |
- 1 user entered 4 "dislike" tags
शेतकरी | Other Not Translation : Peasants doesn't mean शेतकरी! | Dr. N.A. Pande No agrees/disagrees | |
| आजच्या काळात प्रगत जगातील लोक शांततेच्या शोधात असतात परंतू ती त्यांना गवसत नाही. वाहतुकीचा गोंगाट, सातत्याने वाजणारा फोन, बस किंवा आगगाडीतील डिजिटल सूचना, रिकाम्या कार्यालयांमध्ये चालू असलेले दूरदर्शन संच, या साऱ्याचे घणाघाती आघात होऊन व्यत्यय येत असतात. गोंगाटामुळे त्रस्त झालेली मानवजात शांततेच्या शोधात जंगलात, समुद्राच्या सान्निध्यात किंवा एकाग्र आणि स्तब्ध अशा एखाद्या जागेकडे धाव घेते. अॅलेन कॉर्बीन हा सॉर्बॉन येथे राहणारा इतिहास विषयाचा प्राध्यापक लिहितो त्यानुसार आणि अर्लिंग कॅग या नॉर्वेतील संशोधकाने त्याच्या अॅन्टार्क्टिकासारख्या मोकळ्या पसरलेल्या जागेविषयीच्या आठवणीत त्या दोघांनाही शांततेसाठी दूर पळून निघून जावेसे वाटले हा उल्लेख केला आहे. आणि तरीही, श्री. कॉर्बीन त्यांच्या “अ हिस्ट्री ऑफ सायलेन्स” (शांततेचा इतिहास) मध्ये म्हणतात, की कदाचित पूर्वी जितका गोंगाट होता तितका यापुढे असणार नाही. हवेच्या टायरचा शोध लागण्यापूर्वी शहरांचे रस्ते धातूच्या चकत्या लावलेल्या चाकांच्या कर्णकर्कश आवाजाने आणि दगडांवर टपटप वाजणाऱ्या घोड्याच्या टापांनी गजबजत असत. मोबाईल फोन वापरून आजकाल स्वतंत्रपणे होणारी संभाषणे त्या काळात बस आणि आगगाडीत मोठ्या आवाजात गाजत असत. वर्तमानपत्र विक्रेते त्यांच्या पेपरचे गठ्ठे मोठ्या आवाजात जाहिरात करीत विकत असत आणि तितक्याच टिपेच्या आवाजात चेरी(फळे), व्हायोलेट(फुले) आणि ताज्या बाजारातील मालविक्रीही केली जात असे. रंगभूमी आणि ओपेरा मध्ये उच्च स्वराच्या आवाजाला खास मुभा असे. पूर्वी खेडेगावातील शेतकरी कामाला जुंपले असतानाही गाणी गात असत. जे आता गात नाहीत. आधीच्या शतकापासूनच गोंगाटाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल तक्रारीचा सूर येत असे, आजही त्यात फारसा बदल झालेला नाही परंतु जी शांतता मिळत होती त्या शांततेची जागा आज वाढत्या प्रमाणातील व्यत्ययाने घेतलेली आहे. यात विरोधाभास असा की, पाईनच्या घनदाट जंगलात, एखाद्या सुन्न वाळवंटात किंवा अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत हा वेळीअवेळी येणारा व्यत्यय कधीच हवाहवासा न वाटता त्रासदायक वाटतो, पण एका अनोळखी एकटेपणाची भीतीही वाटत असते. कुठे आग लागल्याचा आवाज, एखाद्या पक्ष्यांची किलबिल, पानांचा सळसळाट याची चाहूल लागताच कान सतर्क होतात. लोकांना शांतता हवीशी असते खरी, पण पराकोटीची नाही. | Entry #23017 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Finalist Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
5 | 0 | 2 x2 | 1 x1 |
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.89 | 3.11 (9 ratings) | 2.67 (9 ratings) |
- 2 users entered 2 "like" tags
- 2 users entered 3 "dislike" tags
- 1 user agreed with "dislikes" (1 total agree)
डिजिटल | Other This is not translation!!! | Dr. N.A. Pande No agrees/disagrees | |
| आजच्या काळात, निदान विकसित देशात तरी, लोक शांततेच्या शोधात आहेत पण ती काही त्यांच्या हाती लागत नाहीये. रहदारीचा गोंगाट, दूरध्वनीची अखंड कलकल, बस आणि रेल्वेतील डिजीटल घोषणा, रिकाम्या ऑफिसात देखील चालू असलेले टी.व्ही या आणि अशा अनेक गोष्टींची फौज लक्ष विचलित करत असते. मानवी वंश स्वत:ला या आवाजाने थकवून घेत आहे आणि त्याला शांततेची आस आहे – मग ती एखाद्या घनदाट जंगलात मिळो, समुद्रकिनारी मिळो किंवा अशा शांत ठिकाणी मिळो जिथे फक्त स्तब्धता आणि एकाग्रता नांदते. इतिहासाचे प्राध्यापक ॲलन कॉर्बीन आणि नॉर्वेचे शोधक प्रवासी अरलिंग केज, दोघेही अनुक्रमे सॉबॉर्न आणि ॲन्टार्टिकाच्या जंगलातील आठवणींच्या मदतीने लेखन करतात, जिथे दोघांनी शांतता मिळवण्याकरिता आश्रय घेतला. आणि तरीदेखील, श्री. कॉर्बीन त्यांच्या “अ हिस्टरी ऑफ सायलन्स” या पुस्तकात म्हणतात की, जुन्या काळाच्या तुलनेत आजच्या काळात जास्त आवाज आहे, असे म्हणणे बरोबर नाही. हवेने भरलेले टायर्सच्या यायच्या आधी, धातूची कड असलेली चाके आणि घोड्यांच्या टापांच्या आवाजाने रस्ते गजबजलेले असत. मोबाईल फोन वरील स्वैच्छिक एकलकोंडेपणाच्या अगोदर, बस आणि रेल्वे मध्ये गप्पा रंगत. वर्तमानपत्रविक्रेते फक्त वर्तमानपत्राचा गठ्ठा घेऊन मुकपणे बसत नसत, तर मोठ्या आवाजात त्याची जाहिरात करत; फळं, फुले आणि मासे विक्रेत्यांप्रमाणेच. नाटके आणि संगीत नाटके तर पसंतीच्या आणि नापसंतीच्या आरोळ्यांनी दुमदुमत. ग्रामीण भागात देखील शेतकरी कबाडकष्ट करता करता गाणी गात. आता असे होत नाही. आवाजाची पातळी, ज्याबद्दल अनेक शतकांपासून तक्रार होत आली आहे, वाढली नाहीये तर विचलित होण्याच्या वाढलेल्या पातळीने ती जागा व्यापली आहे जिथे शांततेचे आक्रमण होऊ शकते. आणि तिथेच एक विरोधाभास आहे कारण जेव्हा शांततेचे आक्रमण होते – आत कुठेतरी देवदारच्या जंगलात, उघड्या वाळवंटात किंवा अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत – तेव्हा तिचे स्वागत होण्याऐवजी तो एक घाबरवणारा अनुभव ठरतो. भीतीने व्यापले जाऊन, कान मिळेल त्या आवाजाला पकडायचा प्रयत्न करतात जेणेकरुन या अज्ञात रितेपणापासून त्यांची सुटका होईल, मग तो एखादया ठिणगीचा आवाज असेल, पक्ष्यांची चिवचिव असेल किंवा पानांची सळसळ असेल. लोकांना शांतता हवी आहे, पण अती शांतता नकोय. | Entry #23458 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Finalist Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
1 | 0 | 0 | 1 x1 |
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.95 | 3.00 (9 ratings) | 2.89 (9 ratings) |
- 3 users entered 4 "like" tags
- 1 user disagreed with "likes" (1 total disagree)
शांततेची आस | Flows well good selection of words | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
-1 1 नाटके आणि संगीत नाटके तर पसंतीच्या आणि नापसंतीच्या आरोळ्यांनी दुमदुमत | Good term selection | Yamini Jadhav | |
ठिणगीचा आवाज असेल, पक्ष्यांची चिवचिव असेल किंवा पानांची सळसळ असेल | Flows well good selection of words | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
- 3 users entered 3 "dislike" tags
- 1 user agreed with "dislikes" (1 total agree)
ऑफिसात | Other Not Translation : Office = कार्यालय | Dr. N.A. Pande No agrees/disagrees | |
टी.व्ही | Other marathi word not used | Yamini Jadhav No agrees/disagrees | |
| या युगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे--निदान विकसित जगातले तरी--लोकांना शांतता हवी असते आणि ती त्यांना मिळत नाही. वाहतुकीचा गलबलाट, सतत वाजत राहणारे फोन, बस आणि रेल्वेमधल्या यंत्रवत उद्घोषणा, रिकाम्या कार्यालयांमध्येही चालू असणारे दूरचित्रवाणी संच, हे सर्व म्हणजे कधीच न संपणारा एक कोलाहल आणि अनावश्यक व्यत्यय आहेत. मानवजात स्वतःला या कोलाहलात दमवून टाकत आहे आणि त्याच्या विरुद्ध गोष्टीची, म्हणजे शांततेची, आस धरते आहे--मग ती निबिड अरण्यातली असो, अथांग महासागरातली असो अथवा शांतता आणि एकाग्रतेसाठी निर्मिलेल्या एखाद्या निवांत स्थळीची असो. याबद्दल इतिहासाचे एक प्राध्यापक अॅलन कॉर्बिन त्यांच्या सॉरबॉन येथील एकांत स्थळातून लिहितात तर एक नॉर्वेजियन धाडसी प्रवासी एर्लिंग कॅग त्यांच्या अंटार्क्टिकामधील ओसाड भागांच्या वास्तव्याच्या आठवणींतून लिहितात; हे दोघेही त्या त्या स्थळी शांततेच्या शोधात गेले होते. आणि तरीही, ज्याप्रमाणे श्री. कॉर्बिन त्यांच्या "अ हिस्टरी ऑफ सायलेन्स"मध्ये दाखवून देतात तसे पूर्वी जितका कोलाहल होता त्याहून कदाचित आताचा कोलाहल जास्त नाही. हवा भरलेले टायर येण्यापूर्वी शहरांतील रस्त्यांवर धातूंच्या पट्ट्या लावलेल्या चाकांचा दणदणाट असे आणि पाषाण-पथांवर घोड्यांच्या नालांचा खणखणाट असे. मोबाईल फोनमुळे आलेल्या स्वैच्छिक एकाकीपणाच्या आधी बस आणि रेल्वेमध्ये संभाषणाचा गजबजाट असे. वृत्तपत्रे विकणारे त्यांचे ढीग मांडून शांतपणे उभे राहत नसत तर जोरजोरात आरोळ्या ठोकत त्यांची जाहिरात करत, तसेच बोरे-जांभळे-करवंदे विकणारेही गलबला करीत. नाटक-तमाशांमध्येही आरोळ्या आणि हुर्यो उडवली जाई. ग्रामीण भागातही शेतकरी शेतीची कामे करताना गाणी गात. आता ते गात नाहीत. जो बदल झालाय तो कोलाहलाच्या पातळीत नाही, त्याबद्दल तर पूर्वीच्या शतकांमध्येही तक्रार होतच होती, तर या कोलाहलामुळे येणाऱ्या व्यत्ययाच्या पातळीत आहे; हा व्यत्यय एरवी मिळू शकणाऱ्या शांततेची जागा घेतोय. इथे अजून एक विरोधाभास डोकावतो, जेव्हा शांतता व्यापते--देवदार वृक्षांच्या गहन अरण्यात, उजाड वाळवंटात, अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत--तेव्हा ती हवीहवीशी वाटण्याऐवजी चिंताक्रांत करते. भीती दाटून येते; कान थोड्याशाही आवाजाकडे वेधले जातात, मग तो आगीचा फुत्कार असो, पक्ष्यांची किलबिल असो किंवा पानांची सळसळ असो, असे आवाज शांततेची ती पोकळी भरून काढायला मदत करतात. लोकांना शांतता हवी असते, पण तितकीही नाही. | Entry #22535 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Finalist Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
14 | 2 x4 | 1 x2 | 4 x1 |
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 3.19 | 3.38 (8 ratings) | 3.00 (7 ratings) |
- 4 users entered 4 "like" tags
- 1 user agreed with "likes" (1 total agree)
+1 1 हे सर्व म्हणजे कधीच न संपणारा एक कोलाहल आणि अनावश्यक व्यत्यय आहेत. मानवजात स्वतःला या कोलाहलात दमवून टाकत आहे आणि त्याच्या विरुद्ध गोष्टीची, म्हणजे शांततेची, आस धरते आहे-- | Flows well very good term as कोलाहल | Sudha Sathaye | |
स्वैच्छिक | Good term selection perfect term | rashmisathe No agrees/disagrees | |
तेव्हा ती हवीहवीशी वाटण्याऐवजी चिंताक्रांत करते | Flows well | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
- 1 user entered 1 "dislike" tag
टायर येण्यापूर्वी | Grammar errors टायर वापरात येण्यापूर्वी would be more appropriate | Charuta Kulkarni No agrees/disagrees | |
| Non-finalist entries The following entries were not selected by peers to advance to finals-round voting. आजच्य़ा य़ुगातील विकसित देशांच्य़ा जनतेला शांत वातावरणात रहाण्य़ाची ओढ लागलेली दिसते. असे शांत वातावरण हल्ली दुर्मिळ झाले आहे. कारण शांतताच कुठेतरी हरवली आहे. फक्त कानी पडतात वाहनांचे कर्णकटू आवाज, दूरध्वनी संचांची सतत खणखणणारी घंटी, बसेस आगगाडय़ांच्य़ा स्थानकांवर चाललेल्य़ा उद्घोषणा, कार्य़ालय़ांमध्य़े कामाच्य़ा वेळानंतरही सुरू असलेल्य़ा दूरचित्रवाणीवरील कार्य़क्रमांचे आवाज इत्य़ादी. आजूबाजूच्य़ा शांततेचा भंग करणारे ध्वनीप्रदूषण मानव जातीला मानसिक ग्लानीला सामोरे जाय़ला भाग पाडत आहे. शांततेची ओढ मानवाला घनदाट जंगले, संथ गाज ऐकवणारे सागर किंवा शांती व एकाग्रतेचा मूळ स्त्रोत लाभलेल्य़ा निसर्गरम्य़ ठिकाणी आकर्षित करत आहे. सोर्बोन मध्य़े इतिहासाचा प्राध्य़ापक असलेल्य़ा ऍलेन कॉर्बिनने आपल्य़ा पुस्तकात असेच लिहिले आहे. आणि शांततेचा मागोवा घेत अंटार्क्टिकाला भेट दिलेल्य़ा एर्लिंग केग नावाच्य़ा नॉर्वेजिय़न अन्वेषकाने आपल्य़ा तेथील आठवणींमध्य़े हेच सत्य़ सांगितले आहे. परंतु ऍलेन कॉर्बिन य़ाने आपल्य़ा हिस्टरी ऑफ साय़लेन्स य़ा पुस्तकात असेही लिहिले आहे की पूर्वीच्य़ा काळापेक्षा सध्य़ाच्य़ा काळात कर्कश्श आवाजाचा प्रकोप कमीच झाला आहे कारण न्य़ुमेटिक टाय़र्स मुळे घोड्य़ांच्य़ा टापांचा आवाज किंवा लोखंडी चाकांचा खडखडाट असे आवाज नाहीसे झाले आहेत. सतत भ्रमणध्वनीचा वापर करत राहिल्य़ाने एकटे पडण्य़ाच्य़ा य़ुगापूर्वी बसेस किंवा आगगाड्य़ांमध्य़े लोकांच्य़ा संभाषणांचा आवाज गुंजत असे. वर्तमानपत्र विक्रेते नुसता वर्तमानपत्रांचा ढीग लावून बसत नसत तर मोठ्य़ा आवाजात आपले विकण्य़ाचे कौशल्य़ पणाला लावीत असत. तसेच फळे, फुले किंवा मासे विक्रेते तार सुरात आपल्य़ा वस्तू खपवीत असत. नाट्य़मंदिरे व रंगमंच लोकांच्य़ा गोंगाट व कोलाहलाने गजबजलेले असत. गावागावातील शेते अंग मेहनत करताना गाणी गाणारय़ा शेतकरय़ांच्य़ा आवाजाने दुमदुमत असत. हल्लीचे शेतकरी गातानाच दिसत नाहीत. ध्वनी प्रदूषणाबद्दल पूर्वीच्य़ा काळीही लोकांची तक्रार असाय़ची. हल्लीच्य़ा य़ुगात त्य़ाच्य़ा पातळीत जरी बदल झाला नसला तरी लोकांचे चित्त भ्रमित करून त्य़ांची एकाग्रता भंग करणारय़ा गोष्टींचा अतिरेक होऊ लागला आहे, जिथे शांततेचा शिरकाव होणे केवळ अशक्य़ आहे. य़ातूनच एक विरोधाभास अस्तित्वात आला आहे.जर एखाद्य़ा पाईन व्रुक्षांच्य़ा घनदाट जंगलात किंवा एखाद्य़ा रुक्ष वाळवंटात वा अचानक रिकाम्य़ा झालेल्य़ा खोलीत शांततेने प्रवेश केला तर ती स्वागतार्ह वाटण्य़ाऐवजी भितीदाय़क वाटाय़ला लागते. आणि अशी घोर शांतता नकोशीही होते. मग आपल्य़ा कानांना वणव्य़ाचा ध्वनी किंवा पक्षांचे मंजूळ स्वर किंवा पानांची सळसळ असे आवाज ऐकण्य़ाची इच्छा होऊ लागते जी त्य़ा भय़ावह शांततेला तडा देऊ शकेल. थोडकय़ात काय़ तर लोकांना शांतता हवीहवीशी तर वाटते पण इतकीही नाही की जी भय़प्रद वाटू लागेल. | Entry #23453 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.73 | 2.78 (9 ratings) | 2.67 (9 ratings) |
- 1 user entered 2 "like" tags
वणव्य़ाचा ध्वनी | Good term selection | Sudha Sathaye No agrees/disagrees | |
- 2 users entered 3 "dislike" tags
दुमदुमत | Spelling wrong interpretation | rashmisathe No agrees/disagrees | |
थोडकय़ात | Spelling joining of two letters is not done properly. so wrong spelling. | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
| या युगात, निदान विकसित देशातील तरी महत्वाची बाब म्हणजे तेथील लोकांना शांत वातावरण हवे असते. त्याचा ते शोध घेत असतात. पर्णातू ते त्यांना सहज सापडत नसते. या काळात फोनचा सतत होणार गजर, बस आणि आगगाड्यांतील न संपणाऱ्या यांत्रिक , कृत्रिम आवाजातील घोषणा कार्यालये रिकामी असली तरी तेथे चालू ठेवून गडगडाटी आवाज करणारे आणि बटबटीत प्रकाश फेकणारे दूर दर्शन संच अशा सर्व गोंगाटी साधनांना आणि त्यातून सदैव चित्त विचलित करणाऱ्या आवाजाना संपूर्ण मानव जात वैतागली आहे. तिला आता याच्या विरोधी शांत वातावरण हवे आहे. -- कुठेतरी दूर अरण्यातील, , महासागरातील किंवा जेथे सारे कसा शांत शांत आणि एकाग्रतेला पोषक वातावरण आहे अशी निरवता हवी आहे. इतिहासाचे एक प्राध्यापक श्रीआयलयन कॉर्बिन यांनी सॉरबॉन येथे केलेल्या लेखनात तसेच नॉर्वे मधील संशोधक श्री अर्लिग केंगार यांनी त्यांच्या अंटार्टिका येथील आठवणी लिहिताना असा शांततेच्या अपेक्षेचा उल्लेख केला आहे. या दोघांनी तिकडे धाव घेऊन शांतता मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीसुद्धा प्रा. कॉर्बिन यांनी त्यांच्या ' निरवतेचा इतिहास ' या ग्रंथात पुढील प्रमाणे नोंद केली आहे. "सध्या जितका गोंगाट आहे, त्यात अधिक भर पडण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ शहरांच्या रस्त्यावर वाहनांसाठी हवेचे टायर वापरात येण्यापूर्वी तेथे चालणाऱ्या वाहनांच्या चाकाना लावलेल्या धातूच्या पट्ट्यांची खडखड आणि दगडी रस्त्यावर घोड्यांच्या नालांची घणघण लोकांची श्रावण शक्ती बधीर करीत असे. तर बस आणि गाड्यांच्या प्रवासात आता जशी मोबाइल फोनवर एकतर्फी बडबड चालते त्याऐवजी तेव्हा प्रवाशांच्या जोरजोरात गप्पा चालत. तसाच वृत्तपत्र विकणाऱ्याला शांतपणे त्याचे पेपर विकत येत नसे, तो कर्कश आवाजात पेपरची जाहिरात करत असे, आणि चेरी, जांभळी फळे असा ताजा माल विकणारे तसंच ओरडत असत सिनेमा आणि नाट्यगृहे सुद्धा अखंड वटवटीची आणि मोठ्या आवाजात प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गोंगाट केंद्रे होती. शहराबाहेर गेल्यावर खेड्यात शेतामध्ये काम करणारा कास्तकार त्याच्या भसाड्या स्वरात गाणी म्हणत असे. आता ही गाणी बंद झाली आहेत . मागील शतकात ज्या बद्दल तक्रार असायची त्या आवाजाची पातळी काही कमी झालेली नाही. पूर्वी जेथे फक्त शांतता पसरलेली असायची, आशा जागांवर आता आवाजाने अतिक्रमण करून चित्त विचलीत करणाऱ्या व्यत्ययाचा स्तर आता वाढविला आहे. पण यामध्ये एक विचित्र विरोधाभाससुद्धा आहे. दूरवरच्या एखाद्या दाट रानात , किंवा उजाड वाळवंटात किंवा रिकाम्या दालनात एखादा ध्वनी जेव्हा सहज प्रवेश करतो तेंव्हा त्या आवाजाने भीतीने दचकायला होते. व त्याचा त्रास होतो. . असा आवाज मग कसलाही असो. दिवेलागणीच्या काडीची खरखर, पक्षांची किलबिल किंवा झाडाच्या पानाची सळसळ असो. हे रवसुद्धा शांततेचा भंग करतात आणि आणि बैचेन करून जातात लोकांना शांतता हवी आहे पण ती शांतता भयभीत करणारी नसावी. | Entry #23633 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.50 | 2.50 (8 ratings) | 2.50 (8 ratings) |
- 3 users entered 4 "dislike" tags
घणघण | Spelling wrong selection of word. | rashmisathe No agrees/disagrees | |
भसाड्या | Mistranslations words not included in source | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
| आजच्या युगाची महत्वाची गरज, निदान ह्या विकसित जगतात तरी, जी लोकं शोधत राहतात आणि कुठेच मिळवू शकत नाहीत ; ती म्हणजे शांतता. रस्त्यावरच्या रहदारीचा आवाज , फोनचा अखंड घंटानाद , बस आणि रेल्वेमध्ये देखील यांत्रिकी आवाजांच्या घोषणा, रिकाम्या कचेरीतही बरळत असणारे दूरध्वनी संच हे कधी न संपणाऱ्या बॅटरीसारखे आणि विकर्षण निर्माण करणारे. मनुष्य जात स्वतःचा विनाश स्वतः करून घेतेय ह्या आवाजाच्या गोंधळामूळे आणि ह्याच्या अगदी विरुद्ध - मग ते जंगलात असो वा विशाल समुद्रात , किंवा ती एखादी स्तब्धता आणि एकाग्रतेला समर्पित घटना असो . अलेन कॉर्बिन , इतिहासाचे प्राध्यापक त्यांच्या सॉर्बोनमधील शरणागतीमध्ये आणि इरलिंग कागे नामक नॉर्वेजियन एक्सप्लोरर त्याच्या अंटार्क्टिकातील किनाऱ्यावरच्या आठवणींमधून लिहितात ; जेथे ह्या दोघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आणि तरीही, श्री. कॉर्बिन " शांततेच्या इतिहासाकडे " बोट दाखवितात , तेथे कदाचित तितका अधिक आवाज नाही जितका आधी होता. हवेच्या चाकांआधी, शहरातले रस्ते धातूच्या कानाला बहिरेपणा यावा अशा धातूच्या पट्ट्या बसवलेल्या चाकांच्या आवाजाने आणि दगडावर घासणाऱ्या घोड्यांच्या नालेच्या आवाजाने भरलेले असत. मोबाईल फोनवर स्वैच्छिक एकटेपणा स्वीकारण्याआधी, बस आणि रेल्वे गप्पागोष्टींनीं भरून जात. वर्तमान पत्र विक्रेते त्यांचे सामान कधी मुक्याने सोडून जात नसत किंबहूना मोठ्याने त्याची आरोळी ठोकून जाहिरातबाजी करत ; ते ही सर्वोच्च आवाजात! जसे चेरी विक्रेते, फुले आणि ताजे मॅकरेल मासे विक्रेते बोंबलतात तसेच ! नाटके आणि संगीत नाटके म्हणजे माणसांचा आणि हास्यविनोदांचा गजबजाट असत. अगदी खेडोपाडी देखील, शेतकरी गाडी हाकता - हाकता गाणी गुणगुणत. ते आता गात नाहीत. जे बदलले आहे ते आवाजाची पातळी नाही, ज्याविषयी गेल्या अनेक पिढ्यांनी तक्रारी केल्या ; पण ते आहे विकर्षणाची पातळी, जे अशी जागा व्यापते ज्यात अगदी शांततेमुळेही अडथळा यावा जणू ! इथे आणखी एक विरोधाभास निर्माण होतो, कारण जेव्हा तो अतिक्रमण करतो अगदी पाईनच्या जंगलात , उघड्याबागड्या वाळवंटात, अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत - तो अनेकदा हवासा वाटण्यापेक्षा नैराश्यजनकच ठरतो. आणि मग ढोंगीपणाचे सोंग घेतलेले कान सत्वर कानोसा घेतात; मग तो अग्निशामक दलाचा घंटानाद असो किंवा पक्षांचा किलबिलाट किंवा झाडाच्या पानांची सळसळ जे की त्यांना अनोळखी शून्यतेपासून वाचवेल कदाचित ! लोकांना शांतता हवी आहे, पण अगदी इतकीही नकोय ! | Entry #22933 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.40 | 2.29 (7 ratings) | 2.50 (6 ratings) |
- 1 user entered 2 "dislike" tags
अंटार्क्टिकातील किनाऱ्यावरच्या | Mistranslations | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
| ह्या काळाची दुर्दैवी कथा, निदान या आधुनिक जगाची तरी अशी झाली आहे की, लोकांना शांततेची प्रचंड गरज भासत असताना त्यांना ती अजिबात मिळत नाही. रहदारीचा गोंगाट, फोनचे असह्य बीप्स, बस आणि रेल्वेमधील यांत्रिक घोषणा, अगदी रिकाम्या कार्यांलयांमध्ये देखील चमकत असलेले दूरदर्शन संच ही सगळी म्हणजे अक्षरश: प्रलोभनांची जाळीच जणू! मनुष्यप्राणी गोंगाट आणि गोंधळात स्वत:च स्वत:ला थकवतोय. त्याची खरी जागा निसर्गाच्या सानिध्यात, मग अगदी अथांग समुद्राजवळ किंवा एखादी शांत जागा जिथे त्याचे मन एकाग्र होण्यास काही गोष्टी असतील. इतिहासाचे प्राध्यापक असलेले अॅलन कोबेन हे त्यांच्या सॉर्बोनमधील वास्तव्यादरम्यान लिहीतात आणि मूळचे नॉर्वेचे असलेले एक प्रवासी एर्लिंग कग्गे त्यांच्या अंटार्क्टिकामधील प्रवासादरम्यान लिहीतात, त्या दोघांतील साम्य म्हणजे, त्या दोघांनीही प्रवास केला. तरीही, श्री. कॉर्बिन यांनी 'शांततेचा इतिहास' मध्ये उल्लेख केल्यानुसार जो खरा गोंगाट असायचा तो काही आजच्या काळात राहिला नाही. आजच्या हवा भरून वापरायच्या चाकांचा शोध जेव्हा लागला नव्हता, तेव्हा रस्त्ते भरलेले असायचे ते लोखंडी आर्यांच्या चांकांनी होणार्या छन-छन आवाजाने आणि दगडी रस्त्यांवर पडत असलेल्या घोड्यांच्या टापांनी. मोबाइल फोनमधून हे जे एकटेपण आज आले ते यायच्या आधी बस आणि रेल्वेंमध्ये भरपूर गप्पा रंगत असत. वृत्तपत्रे विकणारा गपचूप पेपर देऊन पैसे घेऊन जात नसत, आज की ताझा खबर म्हणत मोठ्ठ्या आवाजात जाहिरात करत पुढे जात, तसेच चेरी विकणारे सुद्धा आणि फळ मासे विकणारेसुद्धा. नाट्यगृह, ऑपेरागृहे हशा आणी टाळ्यांच्या गजराने भरून वाहत असत. गावकडेही कातकरी आणि शेतकरी कामे करताना आपापल्या परीने गाणी आणि संगीताची साथ घेत असत. आज ते कुणीच गात नाही. बदल झालाय म्हणजे गोंगाट फार वाढलाय अशातला भाग नाही, याधीच्या पिढ्यांनीही ही तक्रार केलीच होती किई, मात्र विचलित करणार्या गोष्टींची व्याप्ती वाढली, ज्यामुळे शांततेवर आक्रमणे वाढलीत. एक विचित्र विरोधाभास गुंफला जात आहे, पाइनच्या जंगलामध्ये, उघड्या पसरलेल्या वाळवंटामध्ये, अचानक रिकाम्या पडलेल्या खोलीमध्ये, हे सगळं स्वागतार्ह नक्कीच नाही पण न आवडणारे देखील आहे. भयंकर भीती वाटू लागते अचानक, कानांवर अचानक कसलेही परिणाम दिसतात, आगीची रखरख असेल, किंवा पक्ष्याचा आवाज असेल किंवा पानांची सळसळ हे सगळं एखाद्याला एकाकीपणाच्या भयंकर गर्तेत कोसळण्यापासून वाचवू शकेल. लोकांना शांतता हवी आहे मात्र इतकी नव्हे की काही ऐकूच येऊ नये. | Entry #23045 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.25 | 2.38 (8 ratings) | 2.11 (9 ratings) |
- 3 users entered 5 "dislike" tags
इतिहासाचे प्राध्यापक असलेले अॅलन कोबेन हे त्यांच्या सॉर्बोनमधील वास्तव्यादरम्यान लिहीतात आणि मूळचे नॉर्वेचे असलेले एक प्रवासी एर्लिंग कग्गे त्यांच्या अंटार्क्टिकामधील प्रवासादरम्यान लिहीतात, | Other sentence is not well-structured. | rashmisathe No agrees/disagrees | |
त्या दोघांनीही प्रवास केला | Spelling Inaccurate translation | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
| या युगाचे सार, निदान विकसित देशांमध्ये तर नक्कीच, असे आहे की, लोकांना शांततीची प्रचंड आवश्यकता आहे; परंतु ती मिळत मात्र नाहीये. वाहतुकीचा कोलाहल, दूरध्वनीसंचांचे न थांबणारे आवाज, बस व रेल्वे गाड्यांमधील यांत्रिक घोषणा, अगदी ओस पडलेल्या कार्यालयात सुद्धा गोंगाट करणारे दूरचित्रवाणीसंच, या साऱ्या अव्याहत चालू असणाऱ्या गोष्टी क्लेशकारक व विचलित करणाऱ्या आहेत. मानवजात स्वतःला गोंगाटाने दमवून टाकते आहे आणि शोधते आहे मात्र त्याच्या नेमके उलटे – मग ते अरण्यात असो, अथांग महासागरावर असो वा प्रतिबंधात्मक अशा स्तब्धता व एकाग्रतेसाठी केलेल्या प्रयासात असो. असे लिहितात सॉर्बान येथील त्यांच्या आश्रयस्थानामधून इतिहासाचे प्राध्यापक अलेन कोर्बिन आणि अंटार्क्टिका येथील कचऱ्याच्या त्यांच्या स्मृतीतून नॉर्वेचे शोधक प्रवासी एर्लिन काग, जिथे दोघेही त्यातून सुटकेसाठी गेले होते. आणि तरीही श्रीयुत कॉर्बिन हे त्यांच्या “शांततेचा एक इतिहास” मध्ये नमुद करतात त्याप्रमाणे कदाचित पुर्वी असायचा त्यापेक्षा हा गोंगाट जास्त नाहीये. वाहनांच्या चाकांची हवेनी भरलेली रबरी रिंगणे येण्यापूर्वी शहरांचे रस्ते चाकांच्या धातूच्या धावपट्यांच्या कर्कश आवाजांनी आणि घोड्यांच्या टापांच्या नादांनी व्यापलेले असायचे. भ्रमणध्वनीसंचांवरचे ऐच्छिक एकलकोंडेपण येण्यापूर्वी बस व रेल्वे गाड्यांमध्ये संभाषणे चालायची. वर्तमानपत्र-विक्रेते त्यांच्या जिन्नसांच्या राशी मुकेपणाने वाटत न जाता त्यांच्या मोठ्यानी जाहिराती करत असत; अगदी फळे, भाज्या व मासे यांचे विक्रेते सुद्धा. चित्रपटगृहे व नाट्यगृहांमध्ये सहमती व विरोधांचा गोंधळ चालू असायचा. गावाकडेही मजूर काबाडकष्ट करताना गाणी गात असत. आता ते गात नाहीत. बदलले काय असेल तर तो गोंगाटाचा स्तर एवढा नाही, ज्याबाबत पूर्वीच्या शतकांमध्येही तक्रार असायची, तर तो आहे विचलित होण्याचा स्तर जो शांततेनी व्यापून टाकायची जागा घेत आहे. यातून आणखी एक विरोधाभास समोर येतो, कारण जेव्हा शांतता ही जागा व्यापून टाकते – देवदार वृक्षांच्या घनदाट अरण्यात, उघड्या वाळवंटात, अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत – तेव्हा ती बरेचदा स्वागतार्ह असण्यापेक्षा निराशादायक ठरते. भीतीचा हळूच प्रवेश होतो; कान साहजिकच अगदी कशाचाही मागोवा घेतात, मग ठिणगीचा आवाज असो, पक्षाचा चिवचिवाट असो, पानांची सळसळ असो, असे काहीही जे या अज्ञात रीतेपणापासून सुटका करेल. लोकांना शांतता हवी आहे, पण एवढीही नाही. | Entry #22988 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.07 | 2.14 (7 ratings) | 2.00 (7 ratings) |
- 2 users entered 3 "like" tags
भ्रमणध्वनीसंचांवरचे ऐच्छिक एकलकोंडेपण | Flows well Good translation | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
देवदार वृक्षांच्या घनदाट अरण्यात, उघड्या वाळवंटात, अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत – तेव्हा ती बरेचदा स्वागतार्ह असण्यापेक्षा निराशादायक ठरते. | Flows well स्वागतार्ह very good word | Sudha Sathaye No agrees/disagrees | |
पक्षाचा चिवचिवाट असो, पानांची सळसळ असो, | Good term selection | Sudha Sathaye No agrees/disagrees | |
- 1 user entered 2 "dislike" tags
कचऱ्याच्या | Spelling Inaccurate translation | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
| ही काळाची संकल्पना किमान विकसीत जगासाठी पूरक जीथे लोकांना शांततेची आस लागून रहाते पण ती मिळत नाही. रस्त्यावरील वाहतुकीची व्रर्दळ, सतत वाजत रहाणारे फोन, बसेस आणि ट्रेन्समधील ध्वनीप्रक्षेपण, रिकाम्या कार्यालयातूनही सतत चालू रहाणारे टिव्ही ही सर्व अखंड बॅटरी देतात आणि एकाग्रता भंग करतात. ध्वनीप्रदुषणाने स्वताला गांजून घेणारी आजची मानव जमात नेमकी विरुध्द अपेक्षा करते. — मग ते घनदाट जंगल, विस्तीर्ण महासागरावरील एखादे विसाव्याचे ठिकाण असू शकते जीथे निश्चलता आणि एकाग्रता वास करते. अलेन कारबीन, इतिहासाचे प्रोफेसर, त्यांच्या सोबोन येथे घेतलेल्या आश्रय स्थानाहून आणि एर्लिग केज, नॉर्वेमधील संशोधक, अंटार्टिकातील पडीका संबधी आठवणी लिहीतात, जीथून दोघांचाही पलायनाचाच प्रयत्न झालेला आहे. आणि तरीही कारबीन “शांततेचा इतिहास” मध्ये सांगतात त्या प्रमाणे आज पर्यंत जितके ध्वनीप्रदुषण होते त्यापेक्षा ते अधिक नसावे. न्यूमॅटिक टायर्स वापरात येण्यापूर्वी धातुच्या कडा असलेल्या चाकांचा पूर्णपणे बधीर करणारा खणखणीत आवाज आणि घोड्याचे दगडावरील टाप. मोबाईल वरच्या ऐच्छिक एकांतापूर्वी बसेस आणि ट्रेन्समधील ऐकू येणारे संभाषण, न्युजपेपर विक्रेते पेपरांची मूक चळत बाजुला करून न ठेवता उंच आवाजात त्याची जाहिरात करीत. जशी ती चेरी, व्हायलेट किंवा ताज्या माशांच्या विक्रेत्यांकडून होत असे. थिएटर आणि ओपेरा मधील हझ्झा आणि बराकींचा गोंधळ. खेडयांमधून शेतकरी देखील गाणी गाध्वनीच्या पातळीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही ज्यासाठी गेलेल्या शतकांचीही तक्रार होती. तर तो बदल वाढलेल्या बेचैनीच्या पातळीवर दिसतो. जी शांततेची जागा, ही बेचैनी बळकावून बसली आहे. इथे एक वेगळी विसंगती निर्माण होते. घनदाट पाईनच्या जंगलात, उजाड वाळवंटावर जेव्हा अनपेक्षितपणे रिकामी झालेली जागा जेव्हा ही बेचैनी बळकावते तेव्हा ती अवस्था स्वागतार्ह न रहाता तीच विवंचना होते. तीथे भीती प्रवेश करते, कुठल्याही गोष्टीचा थांग घेण्यासाठी कान तयार होतात मग ती आग असो, पक्षाची कूक असो किंवा पानांची सळसळ तीच या बेचैनीला अगम्य रितेपणापासून वाचवू शकते. लोकांना शांतता हवी असते पण ती एवढी नाही. त कष्ट करीत. आता ते गाणी गात नाहीत. ध्वनीच्या पातळीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही ज्यासाठी गेलेल्या शतकांचीही तक्रार होती. तर तो बदल वाढलेल्या बेचैनीच्या पातळीवर दिसतो. जी शांततेची जागा, ही बेचैनी बळकावून बसली आहे. इथे एक वेगळी विसंगती निर्माण होते. घनदाट पाईनच्या जंगलात, उजाड वाळवंटावर जेव्हा अनपेक्षितपणे रिकामी झालेली जागा जेव्हा ही बेचैनी बळकावते तेव्हा ती अवस्था स्वागतार्ह न रहाता तीच विवंचना होते. तीथे भीती प्रवेश करते, कुठल्याही गोष्टीचा थांग घेण्यासाठी कान तयार होतात. मग ती आग असो, पक्षाची कूक असो किंवा पानांची सळसळ तीच या बेचैनीला अगम्य रितेपणापासून वाचवू शकते. लोकांना शांतता हवी असते पण ती एवढी नाही. | Entry #23716 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.03 | 1.80 (5 ratings) | 2.25 (4 ratings) |
- 1 user entered 2 "like" tags
| कमीतकमी विकसित जगामध्ये तरी या युगाचा मुद्दा हा लोकांना शांतता हवी असण्याचा आहे. पण ती काही केल्या सापडत नाही. वाहतुकीचा कर्कश आवाज, फोनची निरंतर किरकिर, बसेस आणि ट्रेन मध्ये केले जाणारे डिजिटल प्रक्षेपण, रिकामे असलेल्या कार्यालयांमध्ये देखील टीव्हीचा गलका - हा अंतहीन हल्ला आणि विचलित करणे आहे. मानवजातीने स्वतःवर आवाजाचा भडीमार करवून घेतला आहे. त्यांची इच्छा अगदी या उलट आहे. ते मग वनात, विस्तीर्ण महासागरात किंवा स्थिरता आणि एकाग्रतेसाठी समर्पित असलेल्या एखाद्या एकांतस्थानात ती शोधतात. दोघांनीही जिथे निसटून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्या सॉरबॉन मधल्या आपल्या आश्रयस्थानामधून इतिहासाचे प्राध्यापक एलेन कॉर्बिन त्या बद्दल लिहितात तर नॉर्वेचे संशोधक एर्लिंग कॅगे अंटार्टिकेच्या निर्जन भागातल्या आपल्या स्मृती नमूद करतात. आणि तरीही, जसे कि श्री.कॉर्बिन "हिस्टरी ऑफ सायलेन्स" (शांततेचा इतिहास), मध्ये सांगतात, आधी जसा कोलाहल असे तसा आज कदाचित नाही. हव्याने भरलेले टायर येण्या आधी, शहरे ही दगडांवर धातूंनी मढलेली चाके आणि घोडांच्या नालांच्या कर्कश कडकडाटाने भरलेली होती. मोबाईल फोन पासून स्वैच्छिकरित्या वेगळे राहण्याच्या काळाआधी, बसेस आणि ट्रेन मध्ये संभाषणांची रेलचेल असे. वृत्तपत्र विक्रेते आपला माल काही गुपचूप ठेवत नसत तर ते आपल्या बेंबीच्या देठापासून त्याचा गाजावाजा करत. अगदी तशीच स्थिती फळे-फुले-मासे विकणाऱ्यांची होती. नाटकं आणि तमाश्यात टाळ्यांचा गडगडाहट आणि हुज्जतींचा गोंधळ असे. खेड्यापाड्यातही घाम गाळत शेतकरी गात असत. ते आता गात नाहीत. मागील शतकांतही आवाजाच्या स्तराची तक्रार असे. पण त्या पेक्षाही अधिक, आज जे बदलले आहे ते म्हणजे लक्ष विचलित होण्याचा स्तर. शांतता जिथे नांदू शकते ते अवकाशच तो व्यापून टाकतो. तिथेच दुसरा एक विरोधाभास अस्तित्वात असतो. म्हणजे जेव्हा त्याचा हल्ला होतो—पाईन वनाच्या खूप आत, नग्न वाळवंटात, अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत—तेव्हा तो स्वागताहार्य नसून निराशच करतो. भय सरपटत येते; विस्तवाचा फूत्कार असो कि पक्ष्याची साद किंवा पानांचा सरसराट, या अज्ञात पोकळीतून वाचविणाऱ्या कोणत्याही कारणाकडे कान स्वाभाविकरीत्या टवकारले जातात. लोकांना शांतता हवी आहे पण खूप जास्त नाही. | Entry #24260 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.00 | 2.00 (4 ratings) | 2.00 (4 ratings) |
- 1 user entered 3 "dislike" tags
मुद्दा | Mistranslations inappropriate word selection | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
प्रक्षेपण | Mistranslations inappropriate translation | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
तसा आज कदाचित नाही | Mistranslations mistranslation | Rajashree Pathak No agrees/disagrees | |
| लोकांना नीरव शांततेची ओढ असते आणि त्यांना ती कुठेच मिळत नाही; हे या युगाचे,निदान विकसित देशांच्या विश्वाचे तरी ब्रीद्वाक्य झाले आहे. वाहतूकीचा कोलाहल,फोनच्या घटांचा अव्याहत गजर,बस आणि ट्रेन्स मधील डिजिटल घोषणा,रिकाम्या ऑफिसात देखील टीव्ही सेट्सचा गोंगाट हा सतत आणि अंतहीन व्यत्ययच म्हणायचा. मानवजात स्वत:स कोलाहलाने श्रांत -क्लांत करत आहे आणि त्या विपरित ओढ मात्र त्याच्या अगदी विरुध्द दिशेची-मग ते निबिड अरण्ये, विस्तीर्ण महासागर किंवा संपूर्ण शांतता आणि ध्यान केंद्रित करण्यासाठी समर्पित विसावा असो.इतिहासाचे प्राध्यापक ॲलेन कॉर्बिन त्यांया सोर्बोन मधील विजनवासातून आणि नॉर्वेजियन अन्वेषक एर्लिंग कागे त्यांच्या वेस्ट्स ऑफ अंटार्टिकाच्या आठवणीत लिहितात , जिथे दोघांनीही दूर जाण्याचा प्रयत्न केला आहे. "ए हिस्टरी ऑफ सायलेन्स-शांततेचा इतिहास" या पुस्तकात श्री कॉर्बिन कॉर्बिन निदर्शनास आणून देतात त्या नुसार आधीच्या काळात होता त्याहून अधिक कोलाहल कदाचित आज अस्तित्वात नाही.हवेने भरलेली टायर्स येण्या॒आधी धातूची रिम बसवणारी चाके आणि फरश्यांवर घोड्याच्या टापा कानठळ्या बसवत रस्त्यांवरून जात. मोबाईल फोन्स वर आपणहूनच स्वत:स एकाकी करून घेण्या आधी बस आणि ट्रेन्स मधील वातावरण संभाषणाच्या ध्वनीने भरलेले असायचे.वर्तमानपत्र विक्रेते त्यांची वर्तमानपत्रे गुपचूप पणे एकावर एक रचून जात नसत परंतु त्यांची जाहिरात उच्च स्वरात करत आणि लिमलेटच्या गोळ्या,चेंडू आणि फरसाण यांचे विक्रेते सुध्दा हीच पध्दत अनुसरत.गावाकडील शेतकरी सुध्दा काबाडकष्ट करतांना गात असत. हल्ली ते गात नाहीत. कोलाहलाची पातळी फारशी बदललली नाही,अन कोलाहलाची तक्रार तर या आधीच्या शतकांत सुध्दा व्हायची,बदलली आहे व्यत्ययाची पातळी जी आता व्यापत आहे ती पोकळी जिच्यावर शांतता आक्रमण करू शकते ! या शिवाय आणखी एक विरोधाभास भेडसावतो अन तो म्हणजे पाईनच्या अरण्यात,रखरखित वाळवंटात,अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत जेव्हा शांतता आक्रमण करते -तेव्हा ती सुखकारक वाटण्या ऐवजी आपल्याला हातपाय गळायला लावणारी वाटू लागते. भीती चोरपावलांनी प्रवेश करते,कान अनाहूतपणे कोणत्याही गोष्टीवर टवकारून उभे राहतात मग तो फूत्कार असो वा पक्ष्याची साद वा पानांची सळसळ जी या शांततेच्या अज्ञात पोकळीपासून वाचवेल.लोकांना शांतता हवी आहे पण एवढी नको. | Entry #23015 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 2.00 | 2.00 (5 ratings) | 2.00 (4 ratings) |
- 1 user entered 1 "like" tag
- 1 user agreed with "likes" (1 total agree)
- 1 user disagreed with "likes" (1 total disagree)
-1 +1 2 आपणहूनच स्वत:स एकाकी करून घेण्या आधी | Good term selection | Uddhav Godbole | |
- 2 users entered 4 "dislike" tags
- 2 users agreed with "dislikes" (4 total agrees)
+1 1 लिमलेटच्या गोळ्या,चेंडू आणि फरसाण | Mistranslations चेरीज,जास्वंदीची फुले, ताजे मॅकरेल | Uddhav Godbole | |
| विशेषतः प्रगतशील देशांमध्ये आजकालचे जिवन म्हणजे लोकांना शांतता हवी आहे पण त्यांना ती मिळत नाही. वाहतुकीचा गोंगाट, फोनचे होणारे आवाज, बस आणि ट्रेनमधील डिजिटल घोषणा अथवा रिकाम्या कचेरीतील टिव्ही हे न थांबणारे आणि लक्ष विचलित करणारे आहे. स्वतः मानवजाती ह्या गोंगाटाला कंटाळली आहे आणि त्या शांततेला खूप वाट पाहावी लागू शकेल ती जंगलातली असो वा व्यापक महासागरातील वा स्थिरता व एकाग्रतेला समर्पित केलेले निवासस्थान. इतिहासाचे प्राध्यापक अॅलन कॉर्बीन त्यांच्या सोर्बोनमधील आश्रयस्थानातून आणि नॉर्वेजीएन एक्सप्लोरर एर्लिंग कागे त्यांच्या वेस्ट ऑफ अंटार्टीकाच्या आठवणीतून लिहतात जिथे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केलेला. आणि तरीही, मिस्टर कॉर्बीन "अ हिस्टरी ऑफ सायलेन्स" विषयी सांगतात की तिथे कदाचित आधीसारखा गोंगाट नसावा. न्यूमॅटिक टायर्सपूर्वी शहरातील रस्ते धातूचे चाकं आणि घोड्याच्या नालानी भरलेले असे. मोबाईल फोन्स, बस आणि ट्रेन मधील आवाजांवर नियंत्रण आणण्याआधी पूर्वी वर्तमानपत्र विक्रेते काही शांततेत विक्री करत नसे, मोठ्या आवाजात चेरी विक्रेते, व्हायोलेट आणि मेकरेल विक्रेत्यांसारखे आवाज लगवायचे. नाट्यगृह आणि ऑपेरा हाऊस किंकाळ्या आणि आरडाओरड मध्ये असायचे. खेड्यापाड्यातले शेतकरी गायचे जेव्हा ते काम करायचे, आता ते गात नाहीत. ह्यात झालेला बदलाव हा मागील शतकातील केलेल्या तक्रारीच्या बरोबरीचा नाही पण शांतता नक्कीच गोंधळाच्या स्तरावर आक्रमण करून हावी होईल. पण त्यातही विरोधाभास आहे, जेव्हा आक्रमण होईल देवदार वृक्षाच्या जंगलात, वाळवंटात, अचानक रिकाम्या झालेल्या खोलीत ते नक्कीच स्वागताएवजी निराश ठरते. निराशा येते; कान प्रत्येक गोष्टींवर टवकारले जातात, भलेही मग आगीचं ज्वलन किंवा पक्षांचा आवाज अथवा पानांचा झालेला आवाज त्या एकटेपणातून वाचवेल. लोकांना फक्त शांतता हवी आहे, अजून काही नाही. | Entry #23960 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Rating type | Overall | Quality | Accuracy |
---|
Entry | 1.93 | 1.86 (7 ratings) | 2.00 (6 ratings) |
- 2 users entered 4 "dislike" tags
- 1 user agreed with "dislikes" (1 total agree)
वेस्ट ऑफ अंटार्टीकाच्या | Mistranslations | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
"अ हिस्टरी ऑफ सायलेन्स" विषयी सांगतात | Mistranslations | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
निराश ठरते. निराशा येते; | Mistranslations | Uddhav Godbole No agrees/disagrees | |
| Mistranslations Translation is not appropriate, it is misleading. | Rajashree Pathak | |
| | | | | X Sign in to your ProZ.com account... | | | | | | ProZ.com translation contestsProZ.com translation contests offer a fun way to take a break from your normal routine while testing and honing your skills with fellow translators.
ProZ.com Translation Contests. Patent pending. |